vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

सातारा प्रतिनिधी: दि 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 1817 वादपूर्व प्रकरणे निकाली काढून एकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली करण्यात आली.

वादपूर्व 15622 प्रकरणांपैकी 3205 प्रकरणे निकाली काढून एकूण रुपये चार कोटी सोळा लाख शेहचाळीस हजार तीनशे चार रुपयांची वसुली करण्यात आली. दि. 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीमधील स्पेशल डाईव्‌ह मध्ये एकूण 840 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

यामध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे इ. समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बॅकांची कर्ज, ग्रामपंचायत मालपत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे, विद्युत देयके, दूरध्वनी व भ्रमणध्वनी देयके इ. समावेश होता.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जेष्ठ नागरिक व त्यांच्या मुलांमध्ये समेट घडून जेष्ठ नागरिक यांना त्यांच्या मुलांकडून मासिक पोटगी मिळाली. त्याचप्रमाणे मोटार अपघात प्रकरणामध्ये इंन्शुरन्‌स कंपनी मार्फत रुपये पन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रक्कम देण्याचे मंजूर करण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 7 आणि तालुका न्यायालयात एकूण 24 पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख जिल्हा न्यायाधिश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश आणि दिवाणी न्यायाधिश क स्तर यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनेलवर एक विधीज्ञ पॅनेल सदस्य म्हणून काम पाहत होते.

लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्रधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायधीश, निना बेदरकर यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एम.शेटे, विधिज्ञ, सर्व न्यायिक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

0 0 0 0

संबंधित पोस्ट

राज्यात दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या १ लाख ६० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून विमा संरक्षण मिळणार….

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत बैठक घेणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta