vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू

गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अथडळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणेकरिता ढोल, ताशे इतर वाद्ये वाजवण्याचे विनियमन करुन नियंत्रण आणि ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे या करिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकारा नुसार दि. 29 सप्टेंबर 2026 पर्यंत कालावधीकरिता अधिकार प्रदान केले आहेत.

या अधिकारानुसार त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी, ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे अथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अश प्रकारे कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कटआऊटस्, जाहिराती उभारण्यासाठीही पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी 1951 चे कलम 36 अन्वये सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना योग्य त्या अटी व शर्तींवर संबंधितांना परवानगी देण्यास प्राधिकृत केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

संविधान गौरव संमेलन-लोकांच्या मनामनात रुजवावे संविधान- पालकमंत्री संजय शिरसाट

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…