
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी….
सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात दि. 14 ते 25 सप्टेंबर 2026 अखेर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरूष गर्दी करीत असतात. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये, याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सांगली व मिरज शहरातील विविध मार्गावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येणारी वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिग्रेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना सांगली व मिरज शहरामध्ये खालीलप्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे
सांगली शहर
मनाई आदेश लागू करण्यात आलेले दिवस, कंसात कार्यक्रम व वेळ पुढीलप्रमाणे. 14 सप्टेंबर (1 ला दिवस आगमन), 18 सप्टेंबर (5 वा दिवस विसर्जन), 20 सप्टेंबर (7 वा दिवस विसर्जन), 22 सप्टेंबर (9 वा दिवस विजर्जन), 25 सप्टेंबर (अनंत चर्तुदशी विसर्जन). या सर्व दिवशी 14.00 ते रात्री 23.59 वाजेपर्यंत या वेळेत मनाई करण्यात आलेली आहे
गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग,विश्रामबाग चौकाकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका : विश्रामबाग – पुष्पराज चौक – राम मंदिर – काँग्रेस भवन – कामगार भवन – स्टेशन चौक – राजवाडा चौक – पटेल चौक – तानाजी चौक – गणपती पेठ – टिळक चौक – कृष्णा घाट.
कुपवाड यशवंतनगरकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका : भारत सुतगिरणी चौक – कुपवाड रोड – लक्ष्मी मंदिर चौक – कुपवाड फाटा – नवीन ओव्हरब्रिज – विश्रामबाग चौक – पुष्पराज चौक – राम मंदिर चौक – काँग्रेस भवन चौक – आझाद चौक – स्टेशन चौक – राजवाडा चौक – पटेल चौक – तानाजी चौक – गणपती पेठ – टिळक चौक – कृष्णा घाट.
रिसाला रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका : रिसाला रोड – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – मारुती चौक – गारमेंट सेंटर चौक – बालाजी चौक येथून वेगवेगळे मार्ग• बालाजी चौक – करमरकर चौक – राजवाडा चौक – पटेल चौक – तानाजी चौक – गणपती मंदिर – टिळक चौक – कृष्णा घाट. • बालाजी चौक – झांशी चौक – गणपती मंदिर – टिळक चौक – कृष्णा घाट.
टिंबर एरिया कडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका : कॉलेज कॉर्नर – सांगली हायस्कूल – महाराज चौक – पटेल चौक – तानाजी चौक – गणपती मंदिर – टिळक चौक – कृष्णा घाट.गणपती विसर्जन झालेल्या मंडळांचा परतीचा मार्ग – टिळक चौक – हरभट रोड – गारमेंट सेंटर मार्गे.दुपारी 2 वाजल्यानंतर प्रवेशबंदीची ठिकाणे (बॅरिगेटींग) – वाहतूक नियंत्रण शाखा सांगली कडून (लोखंडी)
टिळक चौक – गणपती मंदिरकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स – सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर – मारूती चौकाकडे जाणारा रस्ता व बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर – करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे – करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक – पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक – टेलिफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगाव रोड – बायपासकडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर – पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी – तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली – झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) – सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधीस्थळ (क्रॉस रोड) – गणपती मंदिरकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय – आनंद टॉकीजकडे जाणारा रस्ता, कामगार भवन – आमराईकडे जाणारा रस्ता, देशपांडे बिल्डिंग (वखारभाग) – पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, अंबा भुवन वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते.
पर्यायी वाहतूक मार्ग,मिरजकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक : पुष्पराज चौक – सिव्हिल हॉस्पिटल – झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर – आनंदी लॉज कॉर्नरमार्गे कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).ईश्वरपूरकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक : ईश्वरपूर टोलनाका – बायपास – कॉलेज कॉर्नर – आपटा चौकी – पुष्पराज चौक – सिव्हिल हॉस्पिटल – झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर – आनंदी लॉज कॉर्नरमार्गे कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).तासगाव/विट्याकडून सांगलीकडे येणारी व जाणारी वाहतूक : संपत चौक – औद्योगिक वसाहत – संजयनगर – 100 फूटी रोड – अहिल्यादेवी होळकर चौकातून शिंदे मळा किंवा मंगळवार बाजारमार्गे सह्याद्रीनगर ब्रिजवरून सांगली शहरात ये-जा करता येईल. तसेच शिंदे मळा – जुना बालाजी मिल रोड किंवा टिंबर एरिया – कॉलेज कॉर्नर – आपटा चौकी – पुष्पराज चौक – सिव्हिल हॉस्पिटल – झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर – आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोडकडे किंवा सांगली शहरात येता व जाता येईल.कर्नाळ – पलूसकडून येणारी व जाणारी वाहतूक : कर्नाळ रोड – शिवशंभो चौक – बायपास रोड – जुना बुधगाव टोलनाका चौक – पट्टणशेट्टी होंडा शोरूम कॉर्नर – कॉलेज कॉर्नर चौक – आपटा पोलीस चौकी – पुष्पराज चौक अथवा काँग्रेस भवन – राम मंदिर चौक – सिव्हिल हॉस्पिटल चौक – सिव्हिल रोड – झुलेलाल चौकमार्गे सांगली शहरात ये-जा करता येईल.
गणेशोत्सव कालावधीतील पार्किंगची ठिकाणेगणेशोत्सव काळात विविध दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पुढील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे :
1. जनावर बाजार (टिळक चौक) तसेच चिंचबाग सांगलीवाडी – ईश्वरपूर व सांगलीवाडीहून येणाऱ्या वाहनांसाठी. 2. जुनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) – चारचाकी वाहनांसाठी. 3. शिवनेरी हॉटेलच्या मागे (भावे नाट्यगृह लगत) – दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी. 4. वैरण बाजार (तरुण भारत स्टेडियमसमोर) – कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी. 5. राजवाडा पटांगण – पलूस व नांद्रे कडून येणाऱ्या वाहनांसाठी. 6. कोर्ट आवार – दुचाकी वाहनांसाठी. 7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम – तासगाव व मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. 8. कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल – तासगावकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. 9. श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम – दुचाकी पार्किंगसाठी. 10. सांगली हायस्कूल, आमराईजवळ – टिंबर एरियाकडून येणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी. 11. कर्नाळ पोलीस चौकीच्या मागील पटांगण (जामवाडी) – कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. 12. पटेल चौक क्रीडा मंडळ – कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी.
मिरज शहर- मिरज शहरात अनंत चर्तुदशी विसर्जन कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजीचे 10.00 वाजल्यापासून ते 26 सप्टेंबर 2026 रोजीचे 16.00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीचे मार्ग-1) चंदनवाडी (सांगली रोड), कुपवाड रोड, पंढरपूर रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका • गांधी चौक – छत्रपती शाहू चौक / स्टेशन चौक – शास्त्री चौक – कृष्णा घाट. • महात्मा गांधी चौक – छत्रपती शाहू चौक / स्टेशन चौक – शास्त्री चौक – महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव. 2) कोल्हापूर ब्रिजकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका : निलजी बामणी व इतर – फुले चौक – शास्त्री चौक – कृष्णा घाट.3) मालगाव सुभाषनगरकडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका :• दिंडी वेस – गाडवे चौक – दत्त चौक – महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव. • दिंडी वेस – गाडवे चौक – दत्त चौक – महाराणा प्रताप चौक – जवाहर चौक – शास्त्री चौक – कृष्णा घाट.
मिरज शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग,
1) गांधी चौक – हिरा हॉटेल चौक / स्टेशन चौक – फुले चौक – शास्त्री चौक – कृष्णा घाट.2) गांधी चौक – हिरा हॉटेल चौक / स्टेशन चौक – महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव.3) दिंडीवेस – गाडवे चौक – दत्त चौक – महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव.4) अ) दिंडीवेस – गाडवे चौक – दत्त चौक – महाराणा प्रताप चौक – जवाहर चौक – शास्त्री चौक –
कृष्णा घाट., ब) किल्ला भागातील मिरवणुका – महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव.5) दिंडीवेस – गाडवे चौक – दत्त चौक – महाराणा प्रताप चौक – जवाहर चौक – शास्त्री चौक – कृष्णा घाट. किल्ला भागातील– महाराणा प्रताप चौक – नागोबा कट्टा – गणेश तलाव.मनाई आदेश लागू करण्यात येणारी ठिकाणे व रोड (दुपारी 2 वाजल्यानंतर बॅरिकेटींग)
1. स्टेशन चौक – मिरासाहेब दर्ग्याकडे जाणारा रस्ता. 2. छत्रपती शाहू चौक – मिरज शहर पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता. 3. श्रीकांत चौक – श्रीकांत चौकाकडे येणारे जोडरस्ते. 4. किसान चौक – श्रीकांत चौक व मिरज शहर पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता. 5. दत्त चौक – श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता. 6. जवाहर चौक – किसान चौकाकडे जाणारा रस्ता. 7. फुलारी कॉर्नर – फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व जोडरस्ते. 8. बॉम्बे बेकरी कॉर्नर – बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व जोडरस्ते. 9. भोसले चौक – पाटील हौदाकडून भोसले चौकाकडे जाणारा रस्ता. 10. झारी मस्जिद कॉर्नर – बॉम्बे बेकरीकडून जाणारा रस्ता. 11. श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावर येणारे सर्व रस्ते.
पर्यायी वाहतूक मार्ग,तासगाव फाट्याकडून येणारी सांगली कोल्हापूरकडे जाणारी वाहने : तासगाव फाटा – गांधी चौक – विश्रामबागमार्गे सांगली व कोल्हापूरकडे जाता येईल व याच मार्गाने परत येता येईल.मालगाव, टाकळी-बोलवाडकडून सांगलीकडे जाणारी वाहने : दिंडी वेस – आळतेकर हॉल – ओ-2 पार्क – कर्मवीर चौक – गांधी चौकमार्गे सांगली शहरात जाता येईल व परतीची वाहतूकही याच मार्गाने करता येईल.मालगाव, टाकळी-बोलवाडकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने : दिंडी वेस – गाडवे चौक – मंडले पेट्रोल पंप – शास्त्री चौक – फुले चौक – कोल्हापूर ब्रिजमार्गे अंकली व कोल्हापूर शहराकडे जाता येईल व परत येता येईल.म्हैसाळ, बेडगकडून सांगली व कोल्हापूरकडे जाणारी वाहने : जुना नाका – शास्त्री चौक – फुले चौक – कोल्हापूर ब्रिजमार्गे रत्नागिरी नागपूर महामार्गाने सांगली व कोल्हापूर शहराकडे जाता येईल व परत येता येईल.एमआयडीसी, मिरजकडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने : एमआयडीसी मिरज – अल्फोन्सा स्कूल – रवा मैदा फॅक्टरी – सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल रोड – मिरज-सांगली रोडमार्गे सांगली व कोल्हापूरकडे जाता येईल व परत येता येईल.एमआयडीसी, मिरजकडून कर्नाटक राज्याकडे जाणारी वाहने : मेनन पिस्टन चौक – तानंग फाटा – तासगाव फाटा – सुभाषनगरमार्गे कर्नाटक राज्यात जाता येईल व परत येता येईल.
गणेशोत्सव कालावधीतील पार्किंगची ठिकाणेशिवाजी क्रीडांगण – कोल्हापूर व सांगलीकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. न्यू इंग्लिश स्कूल – कवठेमहांकाळ व मालगावकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. मिरज हायस्कूल येथील मैदान – आरग, बेडगकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. महात्मा फुले चौक – कर्नाटक व म्हैसाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस – वाहनांची गर्दी झाल्यास पर्यायी पार्किंग व्यवस्था. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
00000



