vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घरपट्टी आकारणी प्रश्नी नागरिकांना दिलासा देत महापालिका हित साधावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- घरपट्टी आकारणीच्या अनुषंगाने घेतला सविस्तर आढावा-⁠ हरकतींवर समितीने वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याचे दिले निर्देश..

घरपट्टी आकारणी प्रश्नी नागरिकांना दिलासा देत महापालिका हित साधावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- घरपट्टी आकारणीच्या अनुषंगाने घेतला सविस्तर आढावा-⁠ हरकतींवर समितीने वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याचे दिले निर्देश..

 सांगली, प्रतिनिधी: सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीच्या अनुषंगाने महापौर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने नागरिकांना दिलासा व महापालिका हित या दोन्ही बाबींची सांगड घालून तोडगा काढावा. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारी व सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी आकारणी अनुषंगाने आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, उपायुक्त राहुल रोकडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महापालिका गटनेते संदीप आवटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, घरपट्टीच्या अनुषंगाने दाखल प्रत्येक हरकतीवर निर्णय घेताना नागरिकांचे समाधान होईल, आणि त्याच वेळी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेलाही निधी मिळेल, याचा विचार करावा. नागरिकांना विश्वासात घेऊन घरपट्टीच्या प्रश्नावर कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

 घरपट्टीवर सर्वसमावेशक मार्ग काढण्याच्या दृष्टीने महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी व सूचनांचा अभ्यास करून आवश्यक शिफारसी समितीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर कराव्यात. आवश्यक कार्यवाही केल्यानंतर त्या लागू कराव्यात, असे ते म्हणाले.

 बैठकीत घरपट्टी आकारणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भांडवली पद्धतीने कर आकारणी करताना नागरिकांच्या मालमत्तेची वस्तुनिष्ठ माहिती, क्षेत्रफळ, वापराचा प्रकार तसेच प्रत्यक्ष मालमत्तेची स्थिती आदिंच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

vishwatmaklokswamivarta

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta