vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी वापराचे ठोक जलप्रशुल्क निश्चित,लाभार्थींनी विहित मुदतीत पाणीपट्टी भरावी – कार्यकारी अभियंता सीमा मोहिते

पाणी वापराचे ठोक जलप्रशुल्क निश्चित,लाभार्थींनी विहित मुदतीत पाणीपट्टी भरावी – कार्यकारी अभियंता सीमा मोहिते

 

सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध प्रकारच्या पाणी वापरासाठी ठोक जलप्रशुल्क (दर) निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी आपल्या पाणीपट्टी बाबतची माहिती संबंधित शाखा कार्यालयातून घेऊन विहित मुदतीत पाणीपट्टी भरून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

विविध प्रकारच्या पाणी वापरासाठी ठोक जलप्रशुल्क पुढीलप्रमाणे -प्रवाही सिंचनाकरिता नोंदणीकृत पाणीवापर संस्थांना खरीप हंगामासाठी 0.08, रब्बी हंगामासाठी 0.16 आणि उन्हाळी हंगामासाठी 0.24 रू. प्रति घ.मी/1000 लि. असा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रवाही सिंचनाकरिता वैयक्तिक लाभधारकांना खरीप हंगामासाठी 0.10, रब्बी हंगामासाठी 0.20 आणि उन्हाळी हंगामासाठी 0.30 रू. प्रति घ.मी/1000 लि. असा दर निश्चित करण्यात आला आहे.

खाजगी उपसा सिंचन योजनांचे ठोक जल प्रशुल्क पुढीलप्रमाणे – आश्वासित पाणीपुरवठा अंतर्गत मोठ्या प्रकल्पांचे जलाशयातील पाणीपुरवठा – खरीप हंगाम 0.08, रब्बी हंगाम 0.17 आणि उन्हाळी हंगाम 0.25 रू. प्रति घ.मी/1000 लि., मध्यम प्रकल्पांचे जलाशय, मोठ्या व मध्यम प्रकल्पांचे कालवे, साठवण तलाव – खरीप हंगाम 0.07, रब्बी हंगाम 0.13 आणि उन्हाळी हंगाम 0.20 रू. प्रति घ.मी/1000 लि.वहनव्ययासह नियंत्रित पाणीपुरवठा – खरीप हंगाम 0.07, रब्बी हंगाम 0.13 आणि उन्हाळी हंगाम 0.20 रू. प्रति घ.मी/1000 लि.

अंशतः आश्वासित पाणीपुरवठा – खरीप हंगाम 0.03, रब्बी हंगाम 0.07 आणि उन्हाळी हंगाम 0.10 रू. प्रति घ.मी/1000 लि.पाणी वापरकर्त्या गटाने स्वखर्चाने बांधलेला व स्वखर्चाने व्यवस्थापन होत असलेले धरण/बंधारा – अ) जलाशय/बंधारा तसेच खाजगी उपसा सिंचन पायाभूत सुविधा संबंधित पाणी वापरकर्ता संस्थेद्वारे स्वतःच्या खर्चाने उभारण्यात व देखभाल करण्यात आलेल्या असतील – खरीप हंगाम 0.01, रब्बी हंगाम 0.02 आणि उन्हाळी हंगाम 0.03 रू. प्रति घ.मी/1000 लि. ब) जलाशय/बंधारा शासनामार्फत उभारण्यात व देखभाल करण्यात आलेला असेल. तथापि, खाजगी उपसा सिंचन पायाभूत सुविधांसंबंधित पाणी वापरकर्ता संस्थेद्वारे स्वतःच्या खर्चाने उभारण्यात व देखभाल करण्यात आलेल्या असतील – खरीप हंगाम 0.02, रब्बी हंगाम 0.03 आणि उन्हाळी हंगाम 0.05 रू. प्रति घ.मी/1000 लि.

प्रवाही सिंचनासाठी वैयक्तिक लाभधारकांसाठी पाण्याचे क्षेत्राधारित पीकनिहाय व हंगामनिहाय प्रतिहेक्टर दर पुढीलप्रमाणे -खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामाचे पीकनिहाय दर रू. प्रति हेक्टर अनुक्रमे पुढीलप्रमाणे – ज्वारी व हरभरा – ४५०, ९०० व १,३५० रुपये, गहू ९००, १,८०० व २,७०० रुपये, भुईमुग १,०३३, २,०६७ व ३,१०० रुपये, तर भात ६७०, १,३४० व २,०१० रुपये दर आहेत.इतर अन्नधान्य पिके ७२०, १,४४० व २,१६० रुपये, ऊस व केळी २,३७५, ४,७५० व ७,१२५ रुपये, कापूस ९००, १,८०० व २,७०० रुपये, तर फळबाग लागवड १,७८०, ३,५६० व ५,३४० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

जलाशय, बंधारे तसेच खाजगी उपसा सिंचन पायाभूत सुविधा संबंधित पाणी वापरकर्ता संस्थेने स्वतःच्या खर्चाने उभारून त्यांची देखभाल केली असल्यास, निश्चित दराच्या १० टक्के दराने जलशुल्क लागू राहील. तसेच या सुविधा शासनामार्फत उभारण्यात व देखभाल करण्यात आल्या असल्यास, संबंधित दराच्या १६ टक्के दराने जलशुल्क लागू राहील.

घरगुती पाणी वापरासाठीचे दर,स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय घरगुती पाणी वापरासाठीचे ठोक जलशुल्क रुपये प्रति घनमीटर / प्रति १,००० लिटर पुढीलप्रमाणे – आश्वासित पाणी पुरवठ्याचा घरगुती वापरासाठी दर- ग्रामपंचायतीसाठी ०.४० रुपये, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी ०.५० रुपये, तर महानगरपालिकेसाठी ०.८० रुपये. तर वाणिज्य दर अनुक्रमे ग्रामपंचायतीसाठी २.०० रुपये, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी २.५० रुपये, तर महानगरपालिकेसाठी ४.०० रुपये आहे.वहन व्ययासह नियंत्रित पाणी पुरवठ्याचे दर पुढीलप्रमाणे – घरगुती वापरासाठी ग्रामपंचायतीसाठी ०.८०, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी १.०० व महानगरपालिकेसाठी १.६० रुपये आहेत. तर वाणिज्य दर अनुक्रमे ग्रामपंचायतीसाठी ४.०० रुपये, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी ५.०० रुपये, तर महानगरपालिकेसाठी ८.०० रुपये आहे.

अंशतः आश्वासित पाणी पुरवठ्याचे दर – घरगुती वापरासाठी ग्रामपंचायतीसाठी ०.२०, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी ०.२५ व महानगरपालिकेसाठी ०.४० रुपये आहेत. तर वाणिज्य दर अनुक्रमे ग्रामपंचायतीसाठी १.०० रुपये, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी १.२५ रुपये, तर महानगरपालिकेसाठी २.०० रुपये आहे.पाणी वापरकर्त्या गटाने प्रमाणशीर खर्चाचा वाटा उचललेला असेल. तसेच पाणी वापरकर्त्या गटाने पायाभूत सुविधा निर्माण केली आणि त्याची देखभाल केली असेल तर घरगुती वापरासाठी ग्रामपंचायतीसाठी ०.०६, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी ०.०८ व महानगरपालिकेसाठी ०.१३ रुपये आहेत. तर वाणिज्य दर अनुक्रमे ग्रामपंचायतीसाठी ०.३२ रुपये, नगरपालिका/नगरपंचायतीसाठी ०.४० रुपये, तर महानगरपालिकेसाठी ०.६४ रुपये आहे.

औद्योगिक पाणी वापरासाठीचे दर रु. प्रति घनमीटर / प्रति १००० लिटर पुढीलप्रमाणे आहेत. आश्वासित पाणी पुरवठा – औद्योगिक प्रवर्ग-अ – १३.५०, औद्योगिक प्रवर्ग-ब – १०२.००, औद्योगिक घटकातील घरगुती पाणी वापर – ०.८०, वहन व्ययासह नियंत्रित पाणी पुरवठा – औद्योगिक प्रवर्ग-अ – २७.००, औद्योगिक प्रवर्ग-ब – २०२.००, औद्योगिक घटकातील घरगुती पाणी वापर – १.६०, अंशतः आश्वासित पाणी पुरवठा – औद्योगिक प्रवर्ग-अ – ६.७५, औद्योगिक प्रवर्ग-ब – ५१.००, औद्योगिक घटकातील घरगुती पाणी वापर – ०.४०, पाणी वापरकर्त्या गटाने प्रमाणशीर खर्चाचा वाटा उचललेला असून, पायाभूत सुविधा निर्माण व देखभाल केलेली असल्यास – औद्योगिक प्रवर्ग-अ – २.१६, औद्योगिक प्रवर्ग-ब – १६.५०, औद्योगिक घटकातील घरगुती पाणी वापर – ०.१५,

 

00000

संबंधित पोस्ट

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

शाळांसाठीच्या निधीचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेत दिसला पाहिजे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,आदर्श व पीएम श्री शाळांच्या कामांचे मूल्यमापन करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश२० पर्यंत पटसंख्या असलेल्या ६४२ शाळांची कारणमीमांसा करून कृती आराखडा तयार करागडचिरोलीतील किमान १०० विद्यार्थ्यांच्या ‘इस्रो’ अभ्यासभेटीचे नियोजन करा

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद-गावागावातील लाभार्थ्यांचा उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद.महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभागविभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन500 वर बचत गटातील 6 हजार महिला सहभागी…

आज सोमवार जिल्हा ग्रंथोत्सव याचा शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta