vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शाळा, महाविद्यालयात तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

शाळा, महाविद्यालयात तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

 सांगली, प्रतिनिधी) : शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणीसोबतच तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी. विविध ठिकाणी कॅम्प घेऊन मौखिक तपासणीबरोबरच जनजागृती करावी. जिल्हा, तालुका, ग्रामपातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांचीही तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. एम. आलासकर, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, वसंतदादा डेंटल कॉलेजचे डॉ. अनिरुद्ध पाटील यांच्यसह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय 100 यार्ड परिसरातील पान टपरीची माहिती शिक्षण विभागाने संकलित करून आरोग्य विभागास द्यावी. तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचाही सक्रिय सहभाग घ्यावा. कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. एम. आलासकर यांनी कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसह राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी पोलिस विभाग, अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एकूण 29 पान टपरीवर दंडात्मक कार्यवाही करून 14 हजार 800 रूपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

00000

संबंधित पोस्ट

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात-सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे