vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवावेत व सांगली जिल्हा नशामुक्त अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट, सांगली यांची बैठक घेऊन औषध दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबत व नशेच्या औषधांच्याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे, श्रीमती ज. प. सवदत्ती यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने औषध विक्री दुकानांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील सर्व औषध दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवावेत. तसेच, नशेच्या औषधांचा खरेदी विक्री लेखा अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना देऊन प्रबोधन करण्यात आले.

जर औषध विक्री दुकानांमध्ये नशेच्या औषधाची अवैध विक्री होताना आढळली तर त्या दुकानावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे बसवणार आधुनिक कंपोझिट स्लीपर्स एआयच्या मदतीने ट्रॅकची देखरेख आणखी सुधारणार