vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव..

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करुन सराव करण्यात आला.दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी यासाठी हा सराव करण्यात आला.या सरावाची पूर्वतयारी करण्यात आली. त्यानुसार आज प्रत्यक्ष सकाळी १० ते १२ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक सरावाचा थरार सुरु होता. जलद प्रतिसाद दलाचे पीएसआय सतिष दिंडे, कमांडो प्रशिक्षक आकाश घोडके, अजिंक्य गाजरे व अन्य्त २२ कमांडो, तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे १ अधिकारी ७ अंमलदार व १३ कमांडो हजर होते. अतिरेक्यांनी केलेला हल्ला, दडून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका कउन अतिरेक्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे इ. अभ्यास या प्रात्यक्षिक सरावात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या निरीक्षणात हा सराव अभ्यास करण्यात आला,असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी कळविले आहे.
००००००

संबंधित पोस्ट

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदार विशाल पाटील यांनी घेतला आढावा..

अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये होणार पहिला टप्पा 16 मे ते 15 जून कालावधीत…

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक