vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल; मोबाईल ॲपमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या सेवा उपलब्ध

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल; मोबाईल ॲपमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या सेवा उपलब्ध

डिजिटल प्रतिनिधी-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी ‘Annasaheb Patil Mahamandal App’ हे मोबाईल ॲप सुरू केले असून, यामुळे आता योजनांची संपूर्ण प्रक्रिया थेट मोबाईलवर करणे शक्य झाले आहे. महामंडळाचा कारभार ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सुरू असला तरी, लाभार्थ्यांना संगणक किंवा सायबर कॅफेवर अवलंबून राहावे लागत होते आणि काही ठिकाणी एजंटमार्फत फसवणुकीचे प्रकारही घडत होते. यावर उपाय म्हणून आणि लाभार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वयंपूर्ण सेवा देण्यासाठी हे युजर-फ्रेंडली ॲप विकसित करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या ॲपवर नवीन वापरकर्ते ओटीपीद्वारे नोंदणी करू शकतात, तर जुन्या लाभार्थ्यांना त्यांच्या विद्यमान आयडी-पासवर्डने लॉगिन करता येईल.

या ॲपद्वारे लाभार्थ्यांना एलओआय, मंजुरी आणि क्लेम या तिन्ही टप्प्यांवरील कागदपत्रे अपलोड करता येतील तसेच अर्जाची स्थितीही तपासता येईल. विशेष म्हणजे, पारदर्शकता वाढवण्यासाठी आता व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले असून, जिल्हा समन्वयकांमार्फत त्याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये जिओ-फेन्सिंग आणि गूगल नकाशाचा वापर करून व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाईल व ही माहिती महामंडळाच्या ईएचआरएमएस प्रणालीशी जोडली जाईल. सर्व सुविधा आता एका क्लिकवर उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हे ॲप डाऊनलोड करून डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

सरकार ऑनलाइन गेमिंग नियम २०२५ च्या प्रचार आणि नियमावलीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. याबाबतची माहिती

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय महामार्ग 166 (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे निवाडे पूर्ण मोबदल्यासाठी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ला प्रारंभ; डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य क्षेत्राचे सखोल चित्रण

vishwatmaklokswamivarta

माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.