vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रकास मुदत वाढ..

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रकास मुदत वाढ..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक निश्चित झाले आहे, असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे. या वेळापत्रकास मुदत वाढ देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पद्धती व वेळापत्रकः-इच्छुक अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.३० सप्टेंबर ते २६ ऑक्टोंबर या कालावधीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.२७ ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि. ३१ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.१० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवर प्रवेशासाठी दुसरी यादी दि.१३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या निवड यादीतील प्रवेशासाठी दि.२० नोव्हेंबर ही अंतिम मुदत असेल.

०००००

संबंधित पोस्ट

हमीभाव खरेदी प्रक्रियेत बारदाना कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी-पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta