vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

 दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

 

मुंबई प्रतिनिधी –

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी सोनं खरेदी करणे ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेलं आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 1 लाखांच्या पार गेले आहेत. आज सोनं किती रुपयांनी महागलं व आजचा भाव जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,18,640 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,08,750 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 88,980 रुपयांवर पोहोचलं आहे.

सोन्याच्या दरातील उच्चांकी वाढीमुळं गेल्या 14 वर्षात सर्वाधिक परतावा दिला आहे. मात्र सोन्याच्या उसळीमागे एक मोठे कारण आहे. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका सरकारची धोरणं आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरातील कपातीची शक्यता आहे. त्यामुळं सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याने 11.4 टक्कांचा परतावा दिला आहे. ऑगस्ट 2011नंतर सोन्याने 15 टक्क्यांपर्यंताचा परतावा दिला आहे. हे आकडेवारीवरुन दिसतय की सोन्यात गुंतवणुक करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरले आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18,640 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,08,750रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 88,980 रुप

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 10,875 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 11,875 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 8,898 रुपये

ग्रॅम सोनं किंम

8 ग्रॅम 22 कॅरेट 87, 000 रुपय

8 ग्रॅम 24 कॅरेट 94,912 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 71, 184 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?10 ग्रॅम 22 कॅरेट 1,18,640 रुपये10 ग्रॅम 24 कॅरेट 1,08,750रुपये10 ग्रॅम 18 कॅरेट 88,980 रुपये

संबंधित पोस्ट

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर  आज पासून सुरू….

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

धारावी वाचविण्यासाठी २ आगस्ट ला आझाद मैदानात उपोषण…..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

शिवचैतन्य प्रतिष्ठान जालना आयोजित मानाची दहीहंडी महोत्सव-२०२४ च्या माध्यमातून जालनेकरांना यंदाही १ सप्टेंबर रोजी मोठा जल्लोष

एनएमएमटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50% सवलत आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू…

vishwatmaklokswamivarta