vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सारथीच्या कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण योजनांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

सारथीच्या कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण योजनांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

        सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत विविध कृषी व कृषीपूरक प्रशिक्षण उपक्रमांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

       या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपनीतील सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या अंतिम तारखा पुढीलप्रमाणे आहेत-       शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026. कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास पाठविण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2026.

ड्रोन पायलट प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 असून ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सारथी संस्थेच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात.मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026. कागदपत्रांच्या हार्ड कॉपी 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत सारथीच्या संबंधित विभागीय कार्यालयास पाठवाव्यात.

कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण: ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 10 दिवसांच्या आत कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित विभागीय कार्यालयास सादर कराव्यात.         प्रशिक्षणासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात व माहितीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

        अधिक माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथी संकेतस्थळ: https://sarthi-maharashtra.gov.in/ तसेच शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी https://sarthi.mahamcdc.com/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

     या प्रशिक्षणांमुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणांचा लाभ लक्षित गटातील पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्राचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले

संबंधित पोस्ट

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी व्हा…

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta