vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सेवा संकल्प अभियान अंतर्गत IFC प्रकल्पातील 4 उपक्रमांचा उद्घाटन आज बोरगाव अर्ज येथे करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद फुलंब्री च्या वतीने आयोजित

सेवा संकल्प अभियान अंतर्गत IFC प्रकल्पातील 4 उपक्रमांचा उद्घाटन आज बोरगाव अर्ज येथे करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद फुलंब्री च्या वतीने आयोजित

बोरगाव अर्ज, ता. फुलंब्री, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने सेवा संकल्प अभियान अंतर्गत क्रांतिज्योती महिला प्रभागसंघ, वडोद बाजार यांच्या कार्यक्षेत्रात IFC (Integrated Farming Cluster – एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प) च्या अंतर्गत महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी 4 उपक्रमांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.सुरू करण्यात आलेले नवीन उपक्रम:

1. किड नर्सरी (शेळी पालन व संगोपन केंद्र) – स्वामिनी महिला स्वयं-सहाय्यता समूह, बोरगाव अर्ज. 2. चिकन व मटन शॉप सरस्वती महिला समूह, बोरगाव अर्ज. गावातील ग्राहकांना ताजे व स्वच्छ मांस उपलब्ध होणार असून समूहातील महिलांना दैनंदिन रोजगार मिळणार आहे.3. अंडी व धान्य संकलन केंद्र – रेणुका माता महिला समूह, बोरगाव अर्ज. या केंद्रात गावातील शेतकऱ्यांकडून थेट धान्य व अंडी खरेदी करून गावातल्या गावात चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होत आहेत.

संबंधित पोस्ट

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; तरुणांना ‘शिका आणि कमवा’ योजनेची संधी

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

टीसीएस’मध्ये दीडशे पदे भरणार; जिल्ह्यातील युवकांना संधी अकोल्यात १५ एप्रिलला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा