vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी : केंद्र शासनाने देशभरात नवीन 4 कामगार संहिता (लेबर कोडस्) लागू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून, भारत सरकारने दि. 21 डिसेंबर 2025 पासून या संहितांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने औद्योगिक संबंध संहिता-2020, वेतन संहिता-2019, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता-2020 तसेच सामाजिक सुरक्षा संहिता-2020 या चारही संहितांशी संबंधित मसुदा अधिसूचना दि. 28 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे.

या मसुद्याबाबत औद्योगिक क्षेत्रातील विविध घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगार संघटना, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दुकाने व आस्थापना प्रतिनिधी, मालक संघटना तसेच संबंधित औद्योगिक क्षेत्रातील इतर भागधारकांचा समावेश आहे. शासनाने या सर्वांनी अधिसूचनेचा अभ्यास करून आपले अभिप्राय लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

हरकती अथवा सूचना कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधितांनी आपले अभिप्राय “कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 ” या पत्त्यावर पाठवावेत. तसेच mh.labourcodes@gmail.com ई-मेलद्वारेही सूचना नोंदविता येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत म्हणजेच दि. 12 जून 2026 रोजी किंवा त्यापूर्वी हरकती व सूचना सादर करणे आवश्यक राहणार आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत…

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जालना येथे मोफत वेब डिझाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे· फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६