vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत युवकांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत युवकांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी

सातारा, प्रतिनिधी महाराष्ट्रातील युवकांना रोजगार, कौशल्य विकास तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत विविध नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एचडीएफसी बँक लिमिटेड या नामांकित संस्थेमध्ये सेल्स अॅड मार्केटिंग पदासाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहे. संबंधित पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ५ जुलै २०२६ आहे.

सदर इंटर्नशिपसाठी उमेदवाराची पात्रता :- भारतीय नागरिक असणे आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे. कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेली असावी. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ९ महिन्यांच्या कालावधीची इंटर्नशिप, दरमहा रु. ९००० इतके विद्यावेतन (Stipend) तसेच एकरकमी रु. ६,००० आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करावे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा (संपर्क क्र. ०२१६२-२३९९३८) येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

vishwatmaklokswamivarta

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

संविधान दिनानिमित्त बुधवारी रॅली

vishwatmaklokswamivarta

मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत…

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम;झटपट नोकरीसाठी आज (दि.२५) ‘जागेवर निवड संधी’ विशेष मोहिम..

vishwatmaklokswamivarta