vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार 

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार

जालना : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात जालना येथील आशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संचालिका आनंद

सुब्रमणियम अय्यर यांना एमएसएमई सुपर स्टार पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे, झोनल जनरल मॅनेजर एनएसआयसी डी.डी.महेश्वरी, हस्तकला, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार सहाय्यक संचालक सुरेश नारायण तांडेकर तसेच संस्थापक, झेप उद्योजिनी पौर्णिमा शिरीषकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आनंदी अय्यर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता,महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यbकेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार

प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे जालना जिल्ह्याचे नाव राज्य वराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी, पालक व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतआहे.

०००००००००

संबंधित पोस्ट

ठाणे महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन 1 ऑक्टोबर रोजी· राम गणेश गडकरी रंगायतन येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’ व ‘ठाणे गुणीजन’ व ‘विशेष’ पुरस्काराने होणार गौरव

vishwatmaklokswamivarta

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta