vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत द्या;प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी

मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत द्या;प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच प्रलंबित प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करून त्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश प्रभारी आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमधील मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा श्री. परदेशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.

यावेळी अपर आयुक्त मंजुषा मिसकर व तहसीलदार के. के. भदाणे उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्यांतील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित तहसीलदार ऑनलाइन माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र व पडताळणीसाठी प्राप्त अर्ज, निकाली काढलेले अर्ज, अवैध अर्ज तसेच प्रलंबित अर्जांची कारणांसह माहिती सादर करण्यात आली.

यावेळी बोलताना श्री. परदेशी म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीने मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत विविध सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांनी शासनाच्या नियमानुसार जलदगतीने कार्यवाही करून आवश्यक अहवाल लवकरात लवकर सादर करावेत. हे अहवाल शिंदे समितीसमोर मांडण्यात येणार आहेत.

तसेच कोणताही अर्ज ९० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या ९० दिवसांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा नियमानुसार तातडीने निपटारा करण्यावरही त्यांनी भर दिला.

अपर आयुक्त मंजुषा मिसकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अवैध ठरविण्यात आलेल्या अर्जांबाबत स्पष्ट कारणे नमूद करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिले आहेत

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

त्‍या’ निर्णयाविरोधात विमाशि संघाचे धरणे आंदोलन१ फेब्रुवारी २०२५ रोजी बोर्ड कार्यालयासमोर निदर्शने

vishwatmaklokswamivarta

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचालाभ घेण्याचे जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन