vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचालाभ घेण्याचे जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचालाभ घेण्याचे जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन

            नवी मुंबई प्रतिनिधी :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या मुख्य कंपनीसह तिच्या अंतर्गत असलेल्या विविध उपकंपन्यांद्वारे विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याबाबत पालघर जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाने आवाहन केले आहे.

 यामध्ये पैलवान कै. मारुती चव्हाण-वडर आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व मुख्य व उपकंपन्यांच्या माध्यमातून समाजातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी https://vnvjntdc.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत.

    या उपकंपन्यांच्या अंतर्गत प्रामुख्याने बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या योजना राबवून पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळवून दिला जात आहे. यामधील ‘एक लाख थेट कर्ज योजने’ अंतर्गत संपूर्ण कर्जाची रक्कम थेट महामंडळाकडूनच दिली जाते. या योजनेची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे, जर लाभार्थ्याने २ हजार ८५ रुपयांचा नियमित मासिक हप्ता याप्रमाणे एकूण ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये या कर्जाची नियमित परतफेड केली, तर लाभार्थ्याला कोणतेही व्याज अदा करावे लागणार नाही, म्हणजेच हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त ठरेल. मात्र, जर लाभार्थ्यांचे मासिक हप्ते थकले, तर त्या थकीत हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के या दराने व्याज आकारण्यात येईल, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

     दुसऱ्या बाजूला, व्याज परतावा योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचे संपूर्ण कर्ज हे बँकेचे राहणार आहे. तथापि, जर लाभार्थ्याने या कर्जाचे हप्ते बँकेत वेळेवर आणि नियमितपणे भरले, तर कमाल १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाची रक्कम महामंडळाच्या वतीने थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा (परतावा) करण्यात येणार आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांवरील व्याजाचा मोठा भार हलका होणार आहे. या सर्व योजनांबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अथवा कोणत्याही शंकेचे निरसन करण्यासाठी नागरिकांनी जिल्हा व्यवस्थापक श्री. राहुल नरवडे यांच्या ९९२३१९२४१४ (9923192414) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच थेट कागदपत्रांच्या प्रत्यक्ष व्यवहारासाठी ‘वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, रूम नंबर २०१, आफ्रीन अपार्टमेंट, ए विंग, विक्रीकर कार्यालया शेजारी, नवली फाटक जवळ (नवली रोड), पालघर – पूर्व, जिल्हा पालघर, पिन कोड – ४०१NDA’ या कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघरचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राहुल नरवडे (आर. एस. नरवडे) यांनी एका 00000

संबंधित पोस्ट

पंढरपूर कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

मेहकर तालुक्यातील 98 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण; 8 जुलैला सोडत

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू