vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र MSME परिषद २०२६’२,५०० हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन

नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र MSME परिषद २०२६’२,५०० हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन

नवी मुंबई, प्रतिनिधी:- महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित (MSSIDC) यांच्या वतीने जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग Micro, Small and Medium Enterprises (MSME) दिनाचे औचित्य साधून येत्या दि. २७ जून २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात “महाराष्ट्र MSME परिषद व MSME पुरस्कार २०२६” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते सायंकाळ ५.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी “संकल्पातून सिद्धीकडे – From Commitment to Achievement” ही संकल्पना (थिम) निश्चित करण्यात आली आहे. एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात MSME क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

 

            या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेमध्ये राज्यभरातील २ हजार ५०० हून अधिक MSME उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान उद्योग जगताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल परिवर्तन, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा तसेच महिला उद्योजकतेला चालना देणे यांसारख्या विषयांवर विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

 

            या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या MSME उद्योगांचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र MSME पुरस्कार २०२६’ चे वितरण केले जाणार आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकता, नवीन उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार नऊ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रदान केले जातील. यामध्ये आर्टिसन/हँडिक्राफ्ट पुरस्कार, नेक्स्टजेन पुरस्कार, डिजिटल आणि एआय एक्सलन्स पुरस्कार, सर्व्हिस पुरस्कार, मॅन्युफॅक्चरिंग पुरस्कार, ग्रीन एंटरप्राइझ पुरस्कार, वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कार आणि एक्सपोर्ट पुरस्कार यांचा समावेश आहे. तसेच ‘चॅम्पियन MSME पुरस्कार’ ही यातील एक विशेष श्रेणी असेल. चॅम्पियन श्रेणी वगळता इतर प्रत्येक श्रेणीत ‘एक्सलन्स’ आणि ‘अचीव्हर्स’ अशा दोन उपश्रेणींमध्ये विजेत्यांची निवड करून राज्यातील नावीन्यपूर्ण, प्रगत आणि तंत्रज्ञानाभिमुख उद्योगांचा सन्मान केला जाणार आहे.

 

            महाराष्ट्रातील सर्व MSME उद्योजकांना या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांतर्फे करण्यात आले आहे. परिषदेच्या दिवशी म्हणजेच दि. २७ जून २०२६ रोजी सायंकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एका पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालिका यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

******

संबंधित पोस्ट

शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुखांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाडयांकडून मोर्चेबांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरु

vishwatmaklokswamivarta