vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद

ठाणे प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कहवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 19/06/2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्र शहाड येथून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 23/06/2026 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक 25/06/2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत एकूण 48 तास पाणी पुरवठा बंद राहील.

       सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 48 तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

        पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनावरण संपन्न

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार

vishwatmaklokswamivarta