vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

गोदाम बांधकाम घटकासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी: कृषि विभागामार्फत सन २०२६-२७ अंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (गळीत धान्य) योजनेंतर्गत फ्लेझी फंड घटकामधील गोदाम बांधकाम बाबीकरिता भौतिक १ चा लक्षांक प्राप्त आहे. तरी सरकारी/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी (FPOS) आणि सहकारी संस्था यांनी सदर बाबीचे अर्ज दि. १५ जुलैअखेर संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

   राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (गळीत धान्य) योजनेंतर्गत २५० मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकामाकरिता लागणारा खर्च मा. प्रकल्प संचालक स्मार्ट यांचे दि. ३१ जुलै, २०२३ च्या पत्रान्वये गोदाम बांधकामाचे दर (बांधकाम + अंतर्गत रस्ते + PEB + इलेक्ट्रीफिकेशन + रॉयल्टी लॅब टेस्टींग चार्जेस + GST) मापदंड प्रति मे. टन रु. ११५२१/- याप्रमाणे गृहीत धरून २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामाकरिता रु. २८.८० लाख खर्चाच्या ५० टक्के किंवा रु. १४.४०/- लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

         ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या SMART / वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत (ज्या बँकेच्या शाखांना IFSC कोड आहे अशा) बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुरी केल्यानंतर संबंधित अर्जदार संस्था सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. तसेच गोदाम बांधकामास देय होणारी अनुदानाची रक्कम बँक कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येईल. गोदाम बांधकाम या बाबीचा लाभ घेण्यासाठी

        लक्षांकापेक्षा अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. तसेच भौतिक व आर्थिक प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांना राहतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक संस्थांनी अर्ज सादर करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबीरांचे आयोजन- 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान राज्यभर अभियान- विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा

vishwatmaklokswamivarta

२४ तासांत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४ मिमी पावसाची नोंदयंदाच्या पावसाळ्यात 1 जून पासून राज्यात सरासरी 332 मिमी पाऊस..

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सव 2025 : पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप (SMART) सोलार योजना

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta