vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबीरांचे आयोजन- 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान राज्यभर अभियान- विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा

गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबीरांचे आयोजन- 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान राज्यभर अभियान- विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा

        सांगली, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राज्यभर “श्री गणेशा आरोग्याचा” अभियान 2026 राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने देण्यात आली.

      या अभियानांतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, मुख्यमंत्री सहायता निधी अंगीकृत रुग्णालये यांच्या माध्यमातून तज्ज्ञ पथकामार्फत शहरी भागातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   या शिबिरांमध्ये विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या होणार आहेत. शिबिरे प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदान साधने आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक- मंत्री छगन भुजबळ· बंद केंद्रे लवकरच सुरू करणार

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

आतची मोठी बातमी- नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये १०:०२ मिनीटांनी भूकंपाचे धक्के जाणवले*