vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड प्रतिनिधी :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्‍या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यादृष्‍टीने गुरुवार 18 जून 2026 रोजी मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयानी कळविले आहे.

नांदेड जिल्‍हयातील तहसिल कार्यालय नांदेड, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या मतदान केंद्र परिसरात गुरुवार 18 जून 2026 रोजी मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त इतर खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

हा आदेश, नांदेड विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा हद्दी पावेतो मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 जून 2026 मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यत मतदान केंद्र परिसरासाठी अंमलात राहील असे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta