vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, प्रतिनिधी: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर राज्यात पुढील 24 तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.राज्यात मागील 24 तासांमध्ये (28 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर जिल्ह्यात 16.1, रत्नागिरी जिल्ह्यात 15.2 मिमी, कोल्हापूर 15.2, आणि रायगड जिल्ह्यात 11.9 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 28 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे 9.9, रायगड 11.9, रत्नागिरी 15.2, सिंधुदुर्ग 19, पालघर 16.1, नाशिक 4.6, धुळे 9.4, नंदुरबार 1.6, जळगाव 1.9, अहिल्यानगर 0.4, पुणे 5.5, सोलापूर ०.१, सातारा ७.१, सांगली ३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड १,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील फये (ता.भुदरगड) गावातील डोंगर उतारावर जमिनीस भेग पडली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गारगोटी – पाटगाव रस्ता प्रजिमा 52 किमी 5/400 चोपडेवाडी गावाजवळ डोंगरास मोठमोठ्या भेगा पडल्याचे आढळले आहे. सदर ठिकाण भूस्खलन प्रवण असून, संततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा उपाय म्हणून प्रजिमा 52 रस्ता या ठिकाणी वाहतुकीस बंद करून वाहतूक पर्यायी मार्गे गारगोटी आकुर्डे करडवाडी कडगाव ममदापूर राज्यमार्ग क्रमांक 179 मार्गे वळवण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात विज पडून एक प्राणी मृत्यू, नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात नऊ प्राण्यांचा मृत्यू व 16 प्राणी जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात पोहताना बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे

०००

संबंधित पोस्ट

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?