vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

 सांगली, प्रतिनिधी : सेवा पंधरवडा अंतर्गत सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन व अतिक्रमणमुक्ती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सांगली अपर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील 5 महसूल मंडळांतील 29 गावांमध्ये शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन व अतिक्रमणमुक्ती मोहिम राबविण्यात आली असल्याचे अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  या उपक्रमांतर्गत एकूण 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, शेतीवर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून घेण्यासाठी 10 संमतीपत्रे प्राप्त झाली, 28 शेतरस्त्यांचे सीमांकन करण्यात आले, शेतरस्त्यांची 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली, एकूण 5 रस्ता अदालती घेण्यात आल्या, 164 रस्त्यांचा विशिष्ट सांकेतांक निश्चित करण्यात आला. भटक्या व विमुक्त जाती जमाती दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये नंदीवाले 143, वडर 1521, रामोशी 206, मरीआई 29, मदारी 123, गारुडी 173, कुणबी 15 असे एकूण 2210 जातीचे दाखले वाटप करण्यात आले या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत कायदेशीर, सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे तसेच महसू‌ल अभिलेखांमध्ये शिवार रस्त्यांची नोंद, क्रमांकिकरण व सीमांकनाव्दारे पारदर्शकता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत जाण्यासाठी स्थायी, कायदेशीर आणि अडथळामुक्त रस्ते उपलब्ध झाले आहेत. महसूल अभिलेखांमध्ये सुधारणा होऊन गाव नकाशे, प्रपत्र 3/1 फ आणि नोंदणी अभिलेख अधिक अचूक झाले आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून, शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल.आय.टी. माजी विद्यार्थी संघटनेचा ‘उडान’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन