vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

जालना । प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांविषयी अत्यंत अश्‍लिल व अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी जालना जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन शासकीय समिती सदस्य चंद्रकांत नाथराव रत्नपारखे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिनेता राहुल सोलापुरकर नावाच्या इसमाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेउकर या दोन महापुरुषांविषयी अत्यंत अश्‍लिल व अशोभनीय वक्तव्य केले आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे दंगलीची परिस्थिती तयार निर्माण झाली आहे. व अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनाला पिडा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करून त्यास तात्काळ अटक करण्यात यावी.

महापुरुषांच्या अवमानाची राज्यात मालिका सुरु झाली आहे. त्या प्रकरणी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी व ती जनतेत प्रकाशित करावी व आतापर्यंत जे अवमानाचे प्रकार झाले आहेत. त्याप्रकरणी सरकारने काय कार्यवाही केले आहे? त्याची माहिती सरकारने जनतेस द्यावं, सततच्या असंसदीय वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे अशांविरोधात उपाययोजना म्हणून सरकारने महामानव सन्मान व अवमान विरोधी कायदा करावा व तो कायदा हा देशद्रोह या कलमात जोडावा अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

निवेदनावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेषराव जाधव, जालना जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन शसकीय समितीचे सदस्य चंद्रकांत रत्नपारखे, अच्युतराव मोहिते, भाऊसाहेब रत्नपारखे, दिग्विजय धांडगे, दिलीप गायकवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग 

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इयत्ता बारावी परिक्षेत कॉपीचे 11 गैरप्रकार

vishwatmaklokswamivarta

सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मंत्री दादाजी भुसे

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून