vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; तरुणांना ‘शिका आणि कमवा’ योजनेची संधी

लातूर जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; तरुणांना ‘शिका आणि कमवा’ योजनेची संधी

लातूर, प्रतिनिधी: येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी २९ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत २९ एप्रिल रोजी देवणी येथील कै. रसिका महाविद्यालय आणि ३० एप्रिल रोजी जळकोट येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी १० वाजता मुलाखती पार पडणार आहेत.

या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा. लि. ही कंपनी सहभागी होणार असून, त्यांच्या ‘टोयोटा कौशल्या’ उपक्रमांतर्गत ‘शिका आणि कमवा’ या तत्त्वावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या संधीसाठी १८ ते २१ वयोगटातील दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, तसेच पदवी शिक्षण घेत असलेले किंवा पदवीधर उमेदवार पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम आणि पासपोर्ट फोटो यांच्या तीन प्रतींसह स्वखर्चाने संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे. या सुवर्णसंधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले असून अधिक माहितीसाठी दत्तात्रय कांबळे (भ्रमणध्वनी क्र. ९०२८२३८४६५) किंवा लहू भंडारे (भ्रमणध्वनी क्र. ८०५५९९२९००) यांच्याशी संपर्क साधावा.

****

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

vishwatmaklokswamivarta

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ महोत्सव; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

vishwatmaklokswamivarta

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta