vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MSSIDC) अंतर्गत फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील MSME घटकांना भाडे तत्त्वावर घेतलेल्या गाळ्यांसाठी आर्थिक सवलत (गाळे भाड्यात दरमहा 50 टक्के सवलत जास्तीत जास्त रु.40 हजार दरमहा) देऊन त्यांना सक्षम करणे हा आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये :Ø प्रत्यक्ष मासिक भाड्याचे 50% अनुदान, झोननुसार मर्यादा : रु.20,000 ते रु.40,000 प्रति महिना.Ø योजना मार्च 2027 पर्यंत लागू : MH RAMP पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा.Ø फ्लॅटेड गाळा किंवा भाड्याने घेतलेल्या जागांचा वापर करून शाश्वत औद्योगिक व रोजगार वाढीस प्रोत्साहन.

पात्रता निकष : पात्रता अटी : MSME उत्पादन क्षेत्रातील असावेत. अर्ज सादर करण्याच्या तारेखपर्यंत 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी अस्तित्वात नसावेत. महाराष्ट्रात उद्यम नोंदणी असावी आणि कायदेशीररित्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटेड गाळा जागेत किंवा खुल्या औद्योगिक जागेत कार्यरत असावेत.· आवश्यक कागदपत्रे : उद्यम प्रमाणपत्र. वैध भाडेकरार (नोटरीकृत किंवा नोंदणीकृत). वैध भाडे पावत्या. पॅन नोंदणी. चार्टर्ड अकाउंटंट (CA) द्वारे यूडीआयएनसह स्वाक्षरी केलेले उलाढाल प्रमाणपत्र.

व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC यांच्या मार्गदर्शनानुसार या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी जिल्हा स्तरावर ऑन-ग्राउंड वर्कशॉप (कार्यशाळा) आयोजित करण्याचे नियोजित आहे. या संदर्भांत ठाणे जिल्ह्यातील किमान 50 पात्र अर्ज सादर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच सर्व ओद्योगिक संघटनांनी, जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी आपल्या सदस्यांना या योजनेची माहिती देऊन अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहीत करावे. अजांची अंतिम तारीख 31 मार्च 2026 असून सदर अर्ज https://msside.maharashtra.gov.in/RAMP/#/EOI या संकेतस्थळावर अर्ज करावे तसेच ज्या क्लस्टर्स किंवा क्षेत्रांमध्ये कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव या कार्यालयास त्वरित सादर करावेत. पात्र MSME घटकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हावे. योजनेची वैधता कालावधी ही दि.31 मार्च 2027 पर्यंत लागू राहील. या योजनेची अनुदान वितरण व मर्यादा ही झोननुसार मर्यादेसह मासिक किवा त्रैमासिक अनुदान दिले जाईल, वार्षिक मर्यादिसह.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे, एमआयडीसी कॉम्पलेक्स, पहिला मजला, मुलुंड चेक नाका जवळ, ठाणे पश्चिम येथे संपर्क साधावे (ई-मेल आयडी-didicthane@gmail.com दूरध्वनी क्र. – 9594648969).

तरी जिल्ह्यातील सर्वांगीण ओद्योगिक विकासासाठी आणि या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक नागरिकाने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज- आमदार डॉ. सुरेश खाडे- अभियान केवळ कागदावर न राहता आपल्या कृतीत उतरवा- पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज

भोकर येथे बुधवारी पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन 

शासकीय आश्रमशाळा पेंढरघोळ येथे ‘शालेय प्रवेशोत्सव’ उत्साहात चिमुकल्यांचे सजवलेल्या कारमधून आगमन

महिला शेतकरी गटांना अवजार बँकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन