केंद्रीय कौशल्य विभागामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन
केंद्रीय कौशल्य विभागामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी
केंद्रीय कौशल्य विभागामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत महाराष्ट्रात देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून ३८७८ स्पर्धकांनी आतापर्यंत अर्ज केला आहे.सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, या स्पर्धेमध्ये ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. https://sevainnovationchallenge.in/ या लिंकच्या माध्यमातून अथवा क्यूआर कोड स्कॅन करून इच्छुक स्पर्धेसाठी आपला प्रकल्प सादर करू शकतात.
यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगरू डॉ.अपूर्वा पालकर,कुलसचिव डॉ.वैभव नरवडे, सृजन ट्रस्टचे विश्वस्त दिपक मुकादम, डॉ. अमित नेहते, विज्ञानभारती कोकण प्रांतच्या अनुपमा कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन्ही संस्थांसह कौशल्य विकास विभागाने सामंजस्य करार झाला. या संस्थांच्या मदतीने स्पर्धेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून, त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत.#सेवाफर्स्टइनोव्हेशनचॅलेंज