vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादी प्रशिक्षण प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना कामकाजाबाबत मार्गदर्शन

जनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादी प्रशिक्षण प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना कामकाजाबाबत मार्गदर्शन

नांदेड प्रतिनिधी : भारताची जनगणना २०२७ अचूक, प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात पूर्वतयारीच्या कामास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘जनगणना २०२७ संक्षिप्त घर यादी’ विषयक एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते.

जनगणना २०२७च्या प्रत्यक्ष कामकाजास १ फेब्रुवारी २०२७पासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलनाची पद्धत, कामकाजाची प्रक्रिया, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्या तसेच जनगणना कामकाजातील विविध बाबींचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याविषयक नियोजनासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने, अचूकतेने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले. जनगणना प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहितीही यावेळी देण्यात आली.

प्रशिक्षणास मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, मनपा उपायुक्त अभिजित वायकोस, जनगणना तहसीलदार विपिन पाटील, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक एस. पी. बागुल, सांख्यिकी अधिकारी पवन गोडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित लिपिक व तांत्रिक सहाय्यक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलोलीच्या नायब तहसीलदार श्रीमती वंदना गवळी यांनी केले.

****

संबंधित पोस्ट

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

vishwatmaklokswamivarta

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे-अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबीमुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद..

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta