vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर मौजे सायाळ येथे वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केली पाहणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर मौजे सायाळ येथे वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केली पाहणी

नांदेड प्रतिनिधी: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी वैरण उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असून, उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा तसेच कृषी पिकांचे अवशेष यांचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिले.

      लोहा तालुक्यातील सायाळ येथे पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैरण विकास योजनेची आज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रगतीशील शेतकरी रत्नाकर ढगे यांच्या शेतास भेट देऊन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या चारा लागवडीची पाहणी केली. तसेच त्यांच्या गोठ्यास भेट देऊन पशुधनाची पाहणी केली व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी करण्यात आलेल्या वैरण व्यवस्थापनाची माहिती घेतली.

      दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी वैरणीची उपलब्धता कमी होऊ नये, यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कडबाकुट्टी यंत्राचा वापर करून वैरणीची बचत करणे, निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, बांधावर नेपियर गवताची लागवड करणे तसेच पशुपालकांमध्ये चारा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

      उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे योग्य पद्धतीने संवर्धन करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी मुरघास निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पशुपालक शेतकऱ्यांमध्ये मुरघास निर्मितीबाबत जनजागृती करून उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे जास्तीत जास्त संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.

     या पाहणीवेळी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय कळसाईत, उपविभागीय अधिकारी विलास नरोटे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्यासह पशुसंवर्धन, कृषी, महसूल, पाणीपुरवठा व इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!**मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत…* **दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!*

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा; सरकारला जनतेच्या रोषाचा इशारा..

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta