vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७ मध्ये लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७ मध्ये लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

 

लातूर, प्रतिनिधी: केंद्र सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ या उपक्रमांतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ – महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी भारताचे भविष्य घडवण्यासाठी पुढे यावे या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले कल्पक विचार, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि विकसित भारतासाठीच्या संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १७ ऑगस्ट २०२७ रोजी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती पात्र असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले युवक-युवती यासाठी नोंदणी करू शकतात. स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांना वाव देणारे प्रमुख प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये विकसित भारतासाठी नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’, लोककला, लोकगीत, चित्रकला व लेखनासाठी ‘कल्चरल ट्रॅक’, दैनंदिन जीवनातील समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्यासाठी ‘डिझाईन फॉर भारत’, सामाजिक व विकासात्मक समस्यांवर तांत्रिक उत्तरे शोधण्यासाठी ‘हॅक फॉर सोशल कॉझ’, युवा उद्योजकांच्या व्यावसायिक कल्पनांसाठी ‘युथ आंत्रेप्रेन्यूअर चॅलेंज’ आणि नेतृत्व, सार्वजनिक कर्तव्य व धोरणात्मक विचार मांडण्यासाठी ‘युथ पार्लमेंट’ अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे

या उपक्रमाची रचना टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून, पुढील टप्प्यांमध्ये विकसित भारत क्विझ, विकसित भारत निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आणि शेवटी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा संवादाचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र तरुणांनी ‘माय भारत’च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून या उपक्रमात सहभाग नोंदवावा आणि विकसित भारत @२०४७ च्या निर्मितीत आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी युवकांनी mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय मानवाधिकार संघटन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांतभैया डोंगरदिवे

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

स्वच्छताकार्यातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रशिक्षणवर्ग