vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

 

रायगड प्रतिनिधी- सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावेत.

सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पुरस्कार देवून व्यक्ती व संस्थांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते.

शासनाने सन 2023-24 या वर्षातील 6पुरस्कारांची दि. 01 फेब्रुवारी रोजी परिपूर्ण जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र सन्माननीय व्यक्ती व संस्थांनी दि.15 फेब्रुवारीपर्यंत आपले विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अलिबाग येथे सादर करावेत. यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 

000000

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

vishwatmaklokswamivarta

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस.