vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक

म राज्य प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे काम झाले. या कामामध्ये अपहार झाल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीवर चौकशी करून वनक्षेत्रपाल यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात सहभाग असलेल्या सर्व घटकांची अधिक सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड अपहारबाबत सदस्य डॉ बाबासाहेब देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य समाधान अवताडे यांनी सहभाग घेतला.

उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री गणेश नाईक म्हणाले, याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. मात्र अजून एक चौकशी अहवाल प्राप्त होणार असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर निश्चित कारवाई करण्यात येईल. पूर्ण तपासणी करून आणि लोकप्रतिनिधींकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिकस्तरावर चालना मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वार्षिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

विशेष सहाय्य योजना; आधार प्रमाणिकरण,मोबाईल संलग्निकीकरण करण्याचे आवाहन

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; जालना शहरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत