vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बनावट नोंदणीप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून कठोर कारवाई

बनावट नोंदणीप्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून कठोर कारवाई

मुंबई, प्रतिनिधी: परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या (एफएमजी) नोंदणीमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) ऑनलाइन नोंदणी पोर्टलमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परिषदेने तातडीने दखल घेतली असून, महाराष्ट्र सायबरमार्फत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका परिषदेने स्पष्ट केली आहे.

परिषदेच्या अंतर्गत तपासणी आणि नोंदणी अभिलेखांच्या छाननीदरम्यान ही अनियमितता उघडकीस आली. प्राथमिक चौकशीत २२ संशयित परदेशी वैद्यकीय पदवीधर आढळून आले. यानंतर ऑनलाइन नोंदणी प्रणालीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. तसेच संबंधित व्यक्तींना मूळ कागदपत्रांसह पडताळणीसाठी परिषदेसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी परिषदेने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र सायबरकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून, पुढील तपास सुरू आहे. या तपासात परिषद संबंधित यंत्रणेला पूर्ण सहकार्य करीत आहे.

वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता, कायदेशीरता आणि वैद्यकीय नोंदणीची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी मिळविणे किंवा ऑनलाइन प्रणालीमध्ये छेडछाड करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णांचे संरक्षण आणि राज्यात केवळ पात्र व पडताळणी केलेले डॉक्टरच वैद्यकीय व्यवसाय करतात, याची खात्री करणे हा वैद्यकीय नोंदणीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या नोंदणीची खात्री महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून करावी आणि संशयास्पद माहिती आढळल्यास ती परिषदेला कळवावी, असे आवाहन परिषेदमार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा