vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर सायंकाळी 5:45वाजता पंतप्रधान तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान एर्नाकुलममध्ये,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) कोची रिफायनरीमध्ये पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी पंतप्रधान करतील. या प्रकल्पामधील गुंतवणूक ₹5,500 कोटींपेक्षा जास्त आहे. या पॉलीप्रोपिलीन युनिटची क्षमता प्रतिवर्षी 400 किलो टन आहे. पॉलीप्रोपिलीन हे पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह घटक, वैद्यकीय उपकरणे, कापड आणि घरगुती उत्पादनांमध्ये वापरले जाणारे एक आवश्यक साहित्य आहे. या सुविधेमुळे भारताची देशांतर्गत पॉलिमर उत्पादन क्षमता मजबूत होईल, आयात अवलंबित्व कमी होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात पंतप्रधान दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पहिला प्रकल्प म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-66 च्या थलापडी-चेंगळा विभागाचा सहा पदरी प्रकल्प, जो 2,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधला गेला आहे. हा विभाग मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. तो कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांसह मंगळुरू आणि मुझापिलनगडसह शेजारच्या प्रदेशांमधील संपर्क मजबूत करेल.

या प्रकल्पामुळे कासारगोड, बेकल, पय्यानूर आणि कन्नूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील संपर्क जोडणीत सुधारणा घडून येईल. यासोबतच या शहरांची अझिक्कल बंदरासोबतची जोडणीही अधिक सक्षम होईल, त्यामुळे इथल्या आणि व्यापाराला चालना मिळेल.

वेंगलम ते रामनट्टुकरा या कोझिकोड या बायपासचे सहा पदरीकरण हा याअंतर्गतचा दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2140 कोटी रुपये इतका खर्च केला गेला आहे. या प्रकल्पामुळे सध्याच्या दुपदरी रस्त्याचा विस्तार होऊन, तो सेवा रस्त्यांसह सहा पदरी महामार्गात रूपांतरीत झाला आहे. यामुळे इथली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वाहतूक क्षमतेत सुधारणा घडून येईल आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होणार आहे. या विस्तारानंतर या मार्गावरचा एका तासापेक्षा जास्तीचा प्रवासाचा वेळ कमी होऊन सुमारे 15 ते 20 मिनिटांवर येईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे कोझिकोड समुद्रकिनारा, बेपोर बंदर आणि कप्पड समुद्रकिनारा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसोबतीच्या संपर्क जोडणीतही सुधारणा घेडून येईल. यामुळे या भागातील पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे.

केरळममध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारलेल्या 23 ग्रामीण रस्त्यांचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील संपर्क जोडणी व्यवस्थेत मोठी सुधारणा घडून येणार आहे. यामुळे इथल्या नागरिकांना बाजारपेठा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींचा सुलभतेने लाभ घेणे शक्य होणार आहे. यातून इथल्या ग्रामीण भागातील उपजीविकेलाही अधिक बळकटी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने,पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे.. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त