vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी,करुन अहवाल द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश…

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी,करुन अहवाल द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वीजा, वादळ इ. घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तसेच अन्य जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीचे प्राथमिक पाहणी अहवाल प्राप्त असले तरी यंत्रणेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करावी,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे सुद्धा या बैठकीस दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातून अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे उपस्थित होते.

  मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ९८ गावे बाधीत झाली असून ५ व्यक्ती मयत तर ५ व्यक्ती जखमी झाले आहेत.६६ जनावरे दगावली आहेत. ६२ पक्क्या घरांची तर ११२ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे.जिल्ह्यात एकूण १२४६ शेतकऱ्यांचे ६१६.३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला आहे.विजा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीची क्षेत्रीय यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करावी. पंचनामे इ. प्रक्रिया करावी व आपला अहवाल पाठवावा.

 

०००००

संबंधित पोस्ट

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta