vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी..

मंगळवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह; खाजगी नौकरी इच्छुक उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्ण संधी..

बुलडाणा, प्रतिनिधी : जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी मोताळा संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी मोताळा येथे करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगारीला मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.

प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केले असून नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजन केले आहे. या मेळावाद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याव्दारे उपलब्ध होणार आहे.

दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली असूननन पात्र, गरजू व नौकरी इच्छुक उमेदवारांनी दि. 27 मे रोजी के. बी. जे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोराखेडी, ता. मोताळा जि. बुलढाणा येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी. उपस्थित कंपन्याच्या प्रतिनीधी समवेत मुलाखत द्यावी. तसेच शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता सुध्दा मुलाखत देऊ शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

संबंधित पोस्ट

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार- मंत्री हसन मुश्रीफ

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन…

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta