vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षणासोबतच मुलांच्या संस्कार आणि मूल्यवर्धनासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना चालना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील कार्यरत अधिकारी वर्षातून किमान दोनदा शाळांना भेट देऊन “प्रेरणा दिवस” साजरा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सोबत आज अलिबाग तालुक्यातील पी. एम. श्री. रा. जि. प. शाळा, नवगाव येथे पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. बोरिस व गुंजीस येथील पाणंद रस्त्यांची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत गुंजीस येथे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. नवगाव आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा तसेच तहसील कार्यालय, अलिबाग कार्यालयाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनिल इंदलकर, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, तसेच मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची  जनमाणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta