vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन…

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन…

जालना प्रतिनिधी- दरवर्षी २ डिसेंबर रोजी भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन असतो. या अनुषगांने प्रदुषण प्रतिबंध उपाययोजना बाबत जनजागृती माहिती देण्यात येते. भोपाळ दुर्घटनाचा परिणाम आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या टॅंकमधुन अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास २०,००० लोकांचा मृत्यू झाला तसेच ५००००० पेक्षा जास्त जखमी अथवा अपंग झाले. प्रदुषण नियंत्रणाबाबतच्या नियमांना प्रसिध्दी देणे व नियमांची अंमलबजावणी करणे. स्वच्छ औद्योगिक प्रक्रियांना प्रोत्साहन देणे. कारखान्यातुन निघणारे सांडपाणी नदीमध्ये न सोडणे. प्रदुषणाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता वाढविणे. प्रदुषण दिसुन आल्यास तात्काळ कळविणे. प्रदुषणाचे संकट संपुर्ण जगामध्ये आहे. ध्वनी, हवा, जल प्रदुषण कसे प्रतिबंध करता येईल यावर उपाययोजना करण्यासाठी ०२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन साजरा करण्यांत येतो. प्रदुषणापासुन मुक्ती मिळविण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करणे. प्रदुषणाचा धोका कमी करणे याकरिता जनतेमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेऊ या. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फेकर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta