vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

जालना, (प्रतिनिधी)- भारतीय कामगार सेना व महिको कंपनीच्या गोकुळवाडी, मांडवा, घाणेवाडी, डेअरी, जालना, दावलवाडी, हातवण, पिंपळगाव,बोरखेडी, सिंधीकाळेगाव आदी फॉर्मवर काम करणार्‍या मुनिम, ड्रायव्हर,सालदार, महिनदार आदी कामगारांच्या वतीने ११ वा ऐतिहासिक मासिक पगारवाढीचा करार आज करण्यात आला. कामगारांनी फटाके फोडून, गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून कराराचे स्वागत केले आहे.करारानुसार कामगारांना वर्षातून दोन युनिफॉर्म सिलाईसह, शुज, रेणकोट,स्वेटर, बारा महिन्यात ३६ सुट्या, घर बांधणीसाठी कर्ज, दिवाळी करिता १५हजार रुपये अ‍ॅडव्हांस, २० टक्के बोनस, ग्रज्युटी, अत्यावश्यक कामाकारिताएमर्जन्सी लोन, यासह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ या करारामुळे,कामगारांना मिळणार आहे. करार करण्यासाठी महिको कंपनीच्या वतीने उपाध्यक्

अजय वैद्य, सलिल भिडे, महेंद्र चव्हाण, दिपक दरक, विनय नखाते, राजेंद्र बनकर तर भारतीय कामगार सेनेच्या वतीने विभागीय संयुक्त चिटणीस प्रभाकर मते, जिल्हाध्यक्ष जनार्धन रेगुडे, युनिटचे पदाधिकारी मदन म्हस्के,दादाराव कावले, विठ्ठल चंद, महेबुबखाँ पठाण आदी उपस्थित होते.

०००००००

फोटो ओळी…..

४- भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक

करार झाला असून कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ झाल्याचा करार करण्यात आला

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतुकीत बदल

vishwatmaklokswamivarta

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta