vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

जालना/प्रतिनिधी –  महाराष्ट्र नव निर्माण सेने च्या वतीने जालना महानगर पालिका हद्दीतील सर्व्हे नंबर 488, सटवाई तांडा येथील मागील 50 ते 60 वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना जमिनी नियमित करून देणे व त्यांच्या घरकुला प्रश्नाच्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी, जालना यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष श्री. बाळु जवाहरलाल जाधव, भारतीय बहुजन क्रांती संघाचे अध्यक्ष श्री. चतुरसिंग भागाजी गोफणे, सामाजिक कार्यकर्ते श्री. जयपाल सवाईराम राठोड, श्री. रमेश उत्तम चव्हाण, श्री. मुकूंददराव चक्रधर झरेकर, श्री. कृष्णा भालेराव, श्री.चैतनभाऊ राठोड, सामाजिक कार्यकर्ता व सटवाई तांडा येथील महिला, पुरुषा ची उपस्थिती होती.

सर्व्हे नंबर 488, सटवाई तांडा या शासकिय जमिनीवर येथील नागरिक मागील 50 ते 60 वर्षापासून राहत आहे. या जागेनियमित करून देण्यासाठी व घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी येथील स्थानिक नागरीक प्रशासकिय स्तरावर अर्ज, निवेदन याद्वारे आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आाहे. परंतु नागरिकांना न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेबांना तसेच महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले यामध्ये शासन निर्णयअन्वये शासकिय अतिक्रमित जमिनीवर प्रशासनांच्या वतीने सर्व्हे करुन जमिनी नियमित करून नागरिकांना हक्काचे घरकुल उपलब्ध करण्यात यावे असे म्हणण्यात आले. अन्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रहिवासी नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाचा वापरुन जन आंदोलन, धरणे आंदोलन काढण्याचा ईशारा उपशहर अध्यक्ष जालना श्री. बाळु जवाहरलाल जाधव व नागरिकांना दिला. या प्रसंगी शांताबाई रमेश पवार, जया बाळु जाधव, भागुजी पवार, छाया अशोक पवार, रवि डोंगरसिंग पवार, सुनिता पवार, सुरेखा पवार, संगिता जाधव, कलाबाई बिडे, नैनसिंग रूपसिंग बिडे, प्रेमसिंग नैनसिंग बिडे, रोशन पदमसिंग गुर्जर, आदिची उपस्थिती होती.

 

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होणार नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*

नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश २५ तारखेपर्यंत शहरात हॉकर्स झोन करा; फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta