vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

 बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

सांगली प्रतिनिधी) – पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाच्या प्राप्त प्रस्तावांवर सर्वच बँकांनी प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी करावी. बँकांना पतपुरवठ्याचे दिलेले उद्दिष्ट त्यांनी विहित वेळेत पूर्ण करावे. बँकांनी महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशालकुमार सिंग, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी अक्षय गोंडेवार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या नंदिनी घाणेकर यांच्यासह, जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे म्हणाल्या, जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजना सन 2025-26 अंतर्गत जून तिमाहीसाठी सर्व क्षेत्राखालील लक्षांकाच्या 150 टक्के म्हणजेच रक्कम रुपये 9 हजार 37 कोटी वाटप झाले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रुपये 5 हजार 557 कोटी तर अप्राथमिक क्षेत्रांसाठी रक्कम रूपये 3 हजार 480 कोटी वाटप झाले आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कृषि व तत्सम क्षेत्रे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र, पीककर्ज वाटप यांसह अन्य प्राथमिक व अप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व विविध महामंडळांतर्गत पतपुरवठा योजनांतर्गत कर्जवाटपाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला..यावेळी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी, युनियन बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी बचत गटाचे वाटप चांगले केल्याने त्यांचे अभिनंदन केले व ज्या बँकांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांनी प्रकरणे निकालात काढावीत असे सांगितले. री के वाय सी. प्रक्रियेतील प्रलंबित बाबींचा बँक वार आढावा अक्षय गोंडवार यांनी घेतला व लवकरात लवकर प्रलंबित री के वाय सी पूर्ण करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार- मंत्री उदय सामंत

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस   सुरू लोकल ट्रेन दहा-पंधरा उशिर, मेट्रोपासून सगळ्या गाड्यांच्या हेडलाईट्स ऑन, मुसळधार पाऊसच पाऊस …

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार- उद्योगमंत्री उदय सामंत· महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम