
क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
ठाणे प्रतिनिधी- जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन लोधा वर्ल्ड स्कूल, ओलंपिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा सिटी, कल्याण येथे करण्यात आला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व क्रीडा क्षेत्रातील टेबल टेनिसपटू शिवप्रिया यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी क्रीडा महोत्सवाचे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून सर्वांनी दिवसभर विविध खेळांचा आनंद घेतला. अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.
सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सांघिक विजेते पदाचे मानकरी शहापूर तालुक्यास पारितोषिक मिळाला आहे. शहापूर तालुक्यातील खेळाडूनी उत्तम प्रकारे प्रत्येक खेळात सहभाग नोंदवला होता. कबड्डी पुरुष प्रथम क्रमांक कल्याण तालुका तर कबड्डी महिला प्रथम क्रमांक भिवंडी तालुका, खोखो पुरूष प्रथम क्रमांक मुरबाड तालुका तर खोखो महिला प्रथम क्रमांक शहापूर तालुका, बॉक्स क्रिकेट प्रथम क्रमांक अंबरनाथ तालुका, लंगडी खेळात प्रथम क्रमांक शहापूर तालुका, रस्सी खेच पुरुष प्रथम क्रमांक शहापूर तालुका तर रस्सी खेच महिला प्रथम क्रमांक अंबरनाथ तालुका, हॉलीबॉल प्रथम क्रमांक भिवंडी तालुका विजेते आहेत. यावेळी हलगीच्या तालावर मोह न आवरता विजेते संघांनी ठेका धरला.
स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक व बँक ऑफ बडोदा यांच्या सौजन्याने उत्तम नियोजन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आले असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी आभार व्यक्त केले. तसेच कमी कालावधीत लोधा वर्ल्ड स्कूल, विशेषतः चिराग मराठे व स्वप्नील घोळे यांचे अमूल्य सहकार्यामुळे क्रीडा महोत्सव उत्साही वातावरणात पार पडला आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खोखो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सी खेच हे खेळ सांघिक पध्दतीने खेळ असून वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, गोळा फेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्कवॅश, कॅरम, बुद्धिबळ, संगीत खुर्ची, जलतरण अशा स्पर्धांमध्ये अधिकारी- कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता.
क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा स्तर, तालुका स्तर, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी वर्ग व शिक्षक वर्ग सहभागी झाले होते.



