vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यातील #पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा आणि #छत्रपतीसंभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे. इतर राज्यातील देखील प्रस्ताव मान्यतेसाठी प्रतीक्षेत आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुन्ह्यांमुळे विमानतळावर नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. काही आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. तसेच आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली.
यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार संजय पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, जे. एम. म्हात्रे , जगदीश गायकवाड, दशरथ भगत, जे.डी. तांडेल यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

#नवीमुंबईआंतरराष्ट्रीयविमानतळ

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

उदंड प्रतिसादाने ‘महालक्ष्मी सरस -२०२६’ प्रदर्शनाची सांगता; २२ कोटींहून अधिक रुपयांची रेकॉर्डब्रेक उलाढाल ग्रामीण महिलांच्या कष्टाचे नवी मुंबईत झाले सोने ; ‘स्मार्ट’ सुविधांनी जिंकली मुंबईकरांची मने

भारत टेक्स’च्या धर्तीवर महाराष्ट्र सदनात वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्री; दिल्लीकरांना पारंपरिक वस्त्रांची पर्वणी

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 जाहीर…

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री६५१ बालकांना १४ नोव्हेंबर पर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार

vishwatmaklokswamivarta