vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

अकोला, प्रतिनिधी बालविवाहमुक्त भारत संकल्प अभियान १०० दिवस व बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात अकोट येथील विद्यांचल द स्कूल या शाळेत अकोट तालुक्यातील महिला शिक्षिकांसाठी महिला बालके यांच्याशी संबंधित कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा मंगळवारी झाली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रोशनी बन्सल यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य शैलजा त्रिवेदी अध्यक्षस्थानी होत्या. ॲड नितेंद्र उंबरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, प्रांजली जैस्वाल, शुभांगी लाहुडकर, डॉ.प्रीती कोगदे, मधुकर सूर्यवंशी, ॲड. मनिषा भोरे, पीएसआय वैभव तायडे उपस्थित होते.

बाललैंगिक अत्याचार अधिनियम, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम, बालविवाह अधिनियम, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, सायबर सुरक्षितता,कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, तसेच महिलांचे कायदे, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. कायदेविषयक पुस्तिकेचे वितरणही यावेळी झाले. तालुक्यातील 410 महिला शिक्षिका सहभागी होत्या. श्री. पुसदकर यांनी प्रास्ताविक केले. अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली साबळे यांनी आभार मानले. गजानन सावरकर, साधना वाघोडे, महेंद्र काकड , वंदना नाथे , लता डांबरे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर,प्रिया इंगळे, महेंद्र गनोदे राम चतुरकर उपस्थित होते.
०००

संबंधित पोस्ट

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड.आशिष शेलार आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’

vishwatmaklokswamivarta

शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्याससंवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल- कलादिग्दर्शक पी.एम. विचारे, डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा’ परिसंवाद

सनबर्न’च्या माध्यमातून होणाऱ्या नशेखोरीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे झारीतील शुक्राचार्य शोधा !* – नशा विरोधी संघर्ष अभियानची मागणी 

vishwatmaklokswamivarta