vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

 सांगली, प्रतिनिधी: सांगली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 ऑगस्ट 2025 रोजीच्या बैठकीत काळी-पिवळी मीटर्ड टॅक्सी, जीप सदृश्य टॅक्सी (मीटर नसलेल्या) व ऑटो रिक्षा या प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित झाली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवले आहे.

काळी-पिवळी मीटर्ड टॅक्सी, जीप सदृश्य टॅक्सी (मीटर नसलेल्या) व ऑटो रिक्षा या प्रवासी वाहनांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. पेट्रोल आणि डिझेल ऑटोरिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील. जे परवानाधारक पेट्रोल ऑटोरिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एलपीजी अथवा सीएनजी इंधनावर रुपांतरीत करून घेतील अशा रिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील. एलपीजी व सीएनजी इंधनावर चालणाऱ्या अॅटोरिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील. मीटर टॅक्सी व मीटर नसलेल्या जीप सदृश्य टॅक्सी त्यांच्या प्रथम नोंदणी दिनांकापसून 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवान्यावरून उतरविण्यात येतील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२६: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान,प्रमाणित बियाणे पुरवठ्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 1.40 लाख दंडात्मक वसूली व 46.5 किलो प्लास्टिक जप्त

vishwatmaklokswamivarta

कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta