vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सुनिल कौसाडीकर लिखित 13 विविध प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन प्रशासकीय कामकाज करतांना ही पुस्तके निश्चित उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री. पापळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

व्दारकानंद प्रकाशन तर्फे प्रकाशित या पुस्तकांमध्ये विभागीय चौकशी (खंड 1 व 2), निवृत्तीवेतन वेळीच कसे मिळेल (खंड 1 व 2), अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका, वैद्यकीय प्रतीपूर्ती, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे खरेदीबाबतचे शासन निर्णय, ई-निविदाबाबतचे जलसंपदा, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासन निर्णय, ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके(खंड 1 ते 5) या पुस्तकांचा समावेश आहे.

पुस्तक प्रकाशनावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती-आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…

मुंबई पवई येथील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण मनसे कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल…