vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांची एकूण सात संकेतस्थळे महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नव्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या नव्या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.

 

मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांच्या हस्तांतरणाची कार्यवाही MahaIT मार्फत सुरू होती. या हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नवीन डोमेन वापरण्याची कार्यवाही करण्यात आली.

या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही काळ तात्पुरती अनुपलब्ध होती. आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व संकेतस्थळे नव्या स्वरूपात नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.नवीन संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे :१. मराठी भाषा विभाग – marathi.maharashtra.gov.in२. भाषा संचालनालय – directorate-marathi.gov.in३. राज्य मराठी विकास संस्था -rmvs-marathi.maharashtra.gov.in४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – sahitya-marathi.maharashtra.gov.in

५. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – marathivishwakosh.maharashtra.gov.in ,६. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड १ ते २०) – vishwakosh-marathi.maharashtra.gov.in,७. मराठी परिभाषा कोश – shabdakosh-marathi.maharashtra.gov.inमराठी भाषा, साहित्य, संस्कृती, विश्वकोश, परिभाषा तसेच विविध संदर्भसाहित्याशी संबंधित माहिती नागरिकांना अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी ही संकेतस्थळे उपयुक्त ठरणार आहेत. सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधितांनी नव्या संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा उपयोग करावा, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ*

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांचे आज तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी मुंबईत आगमन

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..