vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

            बुलढाणा, प्रतिनिधी) : देशातील १९७५ साली झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा बुधवार, दि. २५ जून रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दुपारी १२ वाजता सन्मान सोहळा व प्रशासकीय इमारतीत चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हावासियांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
देशात दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याच्या व आणीबाणी संदर्भात प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
त्यानुषंगाने आणीबाणी काळात बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजकीय कारणासाठी बंदिवास भोगला. त्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आणीबाणी लढ्यातील व्यक्तींचा बुधवार, २५ जून, रोजी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी दि.२५ जूनपासून पासून एक महिना राहणार आहे. या सन्मान सोहळ्यास व चित्रप्रदर्शनास बुलढाणा जिल्हावासियांनी आणि आणीबाणी लढ्यातील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

संबंधित पोस्ट

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजन साळवी यांचा प्रवेश झाला

vishwatmaklokswamivarta

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक..